
सामना ऑनलाईन । इंदूर
आपली ‘फिगर’ बेढब होईल या भीतीपोटी शहरातील महिला बाळाला स्तनपान करण्याचे टाळतात. बाळाच्या भवितव्यापेक्षा त्या स्वतःच्या कमनीय बांध्याची काळजी अधिक वाहतात, असे मत मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी व्यक्त केले. त्या मायाखेडी येथील अंगणवाडी केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या.
शहरातील महिला बाळाला जन्मापासून बाटलीतून दूध पाजू लागतात. बाळाला स्तनपान केवळ आपली फिगर बिघडण्याच्या काळजीमुळे त्या टाळत असतात. पण काचेची बाटली जशी फुटते, तसेच त्यांचे नशीबही एक दिवस फुटेल, असे वादग्रस्त उद्गारही आनंदीबेन पटेल यांनी यावेळी काढले. गरोदर महिलांनी सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अंगणवाडी केंद्रांमध्ये आपली नावे नोंदवावीत, असे सांगतानाच राज्यपालांनी सामान्य महिलांनाही सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी केले.

























































