
मध्य प्रदेशात उघडकीला आलेले हनीट्रॅप प्रकरण म्हणजे आतापर्यंत हिंदुस्थानातील सर्वात मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असताना काँग्रेस प्रवक्ते मानक अग्रवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे.
Manak Agarwal, Congress on honey trapping issue in Madhya Pradesh: One of the biggest reasons for this is that RSS people do not marry. RSS people should get married. Mohan Bhagwat should also get married. https://t.co/2akiq45P2x
— ANI (@ANI) September 27, 2019
‘आरएसएसचे लोक लग्न करत नाहीत हे या रॅकेट मागील सर्वात मोठे कारण आहे. संघातील लोकांनी लग्न केले पाहिजे. मोहन भागवत यांनीही लग्न केले पाहिजे’, असे बेताल आणि वादग्रस्त विधान अग्रवाल यांनी केले आहे. एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेदरम्यान त्यांनी हे विधान केले आहे. ‘या प्रकरणाची एसआयटी चौकशी करत आहे. हे सर्व शिवराज यांच्या काळापासून सुरू झाले होते. या प्रकरणात भाजपच्या अनेक नेत्यांचा समावेश असून हे रॅकेट 5 ते 6 राज्यात पसरले आहे’, असेही ते म्हणाले आहेत.
हनी ट्रॅपमध्ये अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची नावे असण्याची शक्यता आहे. या संबंधित 4 हजार फाईल्स पोलिसांच्या ताब्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सेक्स चॅट, न्यूड व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिप्सचा समावेश आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 8 माजी मंत्र्यांची चौकशी सुरू केली आहे. तसेच 3 हजार लोकांवर या प्रकरणात सामील असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

























































