‘नाव आठवत नव्हतं म्हणून म्हणालो आयटम’, त्या वादग्रस्त विधानावर कमलनाथ यांचे स्पष्टीकरण

काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह्य टीका करत त्यांना ‘आयटम’ म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मध्य प्रदेश भाजप आक्रमक झाली असून त्यांच्या या विधानाविरोधात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज मौनव्रत केलं.

यादरम्यान आपल्या वादग्रस्त विधानावर स्पष्टीकरण देत ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले की,’जेव्हा लोकसभेत यादी येते तेव्हा त्यावरआयटम क्रमांक -1 लिहिलेलं असतं. तसेच विधानसभेत येते तेव्हा त्यावरही आयटम क्रमांक -1 असे लिहिले जाते… आयटम मी दुर्भावनेने किंवा अपमान करायच्या भावनेनं बोललो नाही. आयटम हा अपमानास्पद शब्द नाही आहे. मला त्यावेळी त्यांचं नाव आठवत नव्हतं, म्हणून मी म्हणताना म्हणालो ज्या येथील आयटम आहेत’, असं कमलनाथ म्हणाले आहेत.

काय म्हणाले होते कमलनाथ

मध्ये प्रदेश येथील डबरा येथून काँग्रेसचे उमेदवार असलेले सुरेंद्र राजेश यांच्या प्रचारादरम्यान कमलनाथ म्हणाले की, ‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार असून ते साध्या सरळ स्वभावाचे आहेत. ती यांच्या सारखी नाही, काय नाव आहे तीच? मी काय तीच नाव घेऊ, तुम्ही तर माझ्यापेक्षाही तिला चांगल्याप्रकारे ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं की, ही काय आयटम आहे.’, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानाविरोधात भाजपने निवडणूक आयोगात तक्रार देखील दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या