मध्य प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, तिघांचा मृत्यू सातजण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यप्रदेशातील मुरैना येथे अवैधरित्या सुरु असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाल्याची घटना घडली आहे, या स्फोटात तिघांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. स्फोट इतका भयंकर होता की संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी माणसं अडकल्याचा अंदाज वर्तवला आहे.

मुरैनाच्या बानमौर नगरमध्ये जैतपुर रोड येथील घटना घडली आहे. येथे अचानकपणे फटाक्यांच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला. त्यानंतर संपूर्ण इमारत उद्ध्स्त झाली. गोदामाचे मालक बानमौर निवासी व्यवसायिक निर्मल जैन आहेत. या इमारतीत भाडेकरुही राहत होते.

स्फोटाची माहिती मिळताच पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. इमारतीत फटाख्यांच्या कारखान्यातव्यतिरिक भाडेकरुही राहत होते.