मध्य प्रदेशात वाघ आणि बछडय़ाचा मृतदेह आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात जास्त वाघांची संख्या असलेल्या मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात दीड वर्षाच्या बछडय़ाचा आणि बालाघाट जिह्यात एका वाघाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बछडय़ाचा मृत्यू उपासमारीमुळे झाला असावा, असा अंदाज कान्हा व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालिका अमिता बी. यांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे बालाघाट जिह्यात एका वाघाचा मृत्यू झाला. गेल्या 23 दिवसांत मध्य प्रदेशात एपूण नऊ वाघांनी जीव गमवला आहे.