मार्चपर्यंत सैन्य हटवा! मालदीवच्या राष्ट्रपतींचा हिंदुस्थानला अल्टिमेटम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यापासून मालदीव आणि हिंदुस्थानच्या संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. दरम्यान, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानविरोधी सूर आळवला असून हिंदुस्थानने 15 मार्चपर्यंत आपलं सैन्य हटवण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर मालदीव सरकारने तीन मंत्र्यांना निलंबित केले. परंतु, आता चीनहून परतल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांची भाषा बदलली आहे. आम्ही छोटे असू. परंतु, आम्हाला धमकावण्याचे लायसन्स कुणाला देण्यात आले नाहीत, असे विधान त्यांनी केले होते.

त्यानंतर पुन्हा एकदा हिंदुस्थानी सैन्य हटवण्याचा इशारा दिला आहे. यापूर्वी राष्ट्रपती मुइज्जू यांनी असाच धमकीवजा इशारा दिला होता. मुइज्जू यांच्या म्हणण्यानुसार, हिंदुस्थानी सैनिक मालदीवमध्ये राहू शकत नाहीत. त्यामुळे हिंदुस्थानने आपल्या सैन्याला 15 मार्चपर्यंत मालदीववरून हटवावे असं मुइज्जू म्हणाले आहेत.