भायखळ्यात महाविकास आघाडीचा मेळावा मोठय़ा उत्साहात पार पडला. या मेळाव्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), समाजवादी पार्टी, आरपीआय आदी पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीत एकदिलाने काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रिक करणारे शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांचा या वेळी जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे नेते मधू चव्हाण, जुनैद पटेल, राष्ट्रवादीचे नसीम सिद्दिकी, रूपेश खांडके, बबनराव कनावजे, समाजवादीचे आमदार रईस शेख, युसूफ अन्सारी, शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेते मनोज जामसुतकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, आमदार सुनील शिंदे, सत्यवान उभे, आरपीआयचे मिलिंद सुर्वे यांनी या वेळी उपस्थितांना संबोधित केले. प्रास्ताविक विधानसभा समन्वयक बबन गावकर यांनी तर सूत्रसंचालन उपविभागप्रमुख राम सावंत यांनी केले.
यावेळी काँग्रेसचे समीर चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवीण खामकर, संघटक मंगेश बनसोड, उपविभागप्रमुख विजय कामतेकर, नगरसेवक रमाकांत रहाटे, सहसंघटक सूर्यकांत पाटील, समन्वयक सुरेखा राऊत, संघटक चंदना साळुंखे, उपविभाग संघटक किर्ती शिंदे, उषा पाटोळे, रमेश रावल, निगाप्पा चलवादी, सुहास भोसले, विनोद शिर्पे, सलीम शेख, प्रियांका टेमकर, संगीता कोरे, शीतल थोरात, सोनल सायगावकर, समन्वयक सुनील हिरवे, रमेश चेंदवणकर, इम्रान खान, विकास झगडे, मनीषा जांबरे, ऋता कोळी, हर्षदा वस्ते, विराज बनसोड, सिद्धेश मंडलिक, अमित जाधव, राजन कोळंबेकर, ओमकार पाटील आदी उपस्थित होते.