
बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा दिवस असून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्यांवर आंदोलन केले.
बजेट म्हणजे भ्रमाचा ‘भोपळा’, मविआचे आमदार भोपळा घेऊन उतरले विधानभवनाच्या पायर्यांवर, तुफान घोषणाबाजी #ajitpawar #maharashtra #eknathshinde #devendrafadnavis #saamanaonline #budget2023 pic.twitter.com/4YeixphxAD
— Saamana (@SaamanaOnline) March 10, 2023
अजित पवार – राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ शब्दांचे फुलोरे, स्वप्नांचे इमले आणि घोषणांचा सुकाळ आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता यातील किती गोष्टींची फलश्रृती होईल याबाबत शंकाच आहे. देवेंद्रजींच्या रुपाने एक अभ्यासू अर्थमंत्री मिळाला असे वाटले होते मात्र अर्थसंकल्प कसा लिहावा? हे पुस्तक लिहिणे आणि खराखुरा अर्थसंकल्प लिहिणे यात खूप फरक आहे. अर्थसंकल्प कसा लिहावा यात अर्थमंत्री कमी पडले.
धनंजय मुंडे – राज्याचा अर्थसंकल्प आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्याचा प्रकार आहे. मागच्या अर्थसंकल्पात तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या विकासाच्या पंचसुत्रीची ‘पंचामृत’ या गोड नावाखाली केलेली नक्कल आहे.
View this post on Instagram
जयंत पाटील – अर्थसंकल्प 16 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थमंत्र्यांनी मांडला परंतु ज्या घोषणा केल्या त्या किमान लाखभर कोटीच्या असल्याने त्याची बेरीज केली तर ही तूट 16 हजार कोटीवरुन एक लाख कोटीवर देखील जाऊ शकते अशा स्वप्नाळू अर्थसंकल्पाचे दर्शन झाले.


























































