महाबळेश्वरमध्ये घेता येणार पौष्टिक काळ्या चपात्यांचा आस्वाद

राज्याचे ‘मिनी कश्मीर ‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये कृषी विभागामार्फत काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली होती. आता हा गहू काढणीला आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यं,स्ट्रॅाबेरीसह पौष्टीक व चविष्ठ अशा काळ्या गव्हांच्या चपात्यांचा आस्वाद घेता घेता येणार आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये नावीन्यपूर्ण बाब म्हणून कृषी विभागामार्फत महाबळेश्वर येथे काळ्या गव्हाची लागवड करण्यात आली.हा गहू ‘एनबीएनजी गव्हाचा वाण आहे.नॅशनल अॅग्री फूड बायोटेक्रॅाजी इन्सिट्यूट मोहाली पंजाब येथील डॅा.मोनिका गर्ग यांनी या वाणाचा शोध लावला आहे.महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर येथील गणेश जांभळे,पंढरीनाथ लांगी,अवकाळी येथील मनोहर भिलारे, विजयराव भिलार, भिलार येथील जयवंत भिलारे यांसह क्षेत्र माहुली सातारा येथील युवराज माने व विक्रम कदम यांनी या गव्हाची लागवड केली आहे. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे,उपसंचालक विजय राऊत ,उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड सर यांचे मार्गदर्शन सहकार्य मिळत आहे.

यंदा प्रतिकूल हवामानातसुध्दा साधारण 70-100 क्विंटल काळ्या गव्हाचे उत्पादन होईल ,असा अंदाज कृषी सहायक्क दीपक बोर्डे यांनी व्यक्त केला आहे.त्यामुळे पुढील हंगामासाठी काळ्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध होणार आहे.याशिवाय महाबळेश्वर येथे काही हॉटेलमधून पर्यटकांना काळ्या आस्वाद मिळणार आहे.भविष्यात नूडल्स,ब्रेड तयार करणाऱ्या कंपन्या या काळ्या गव्हाच्या औषधी व पौष्टीक गुणधर्माकडे आकर्षित होऊन शेतकऱ्यांना जास्तीचा दर मिळू शकतो,असा विश्वासही बोर्डे यांनी व्यक्त केला.

साताऱ्यात येथे झाली लागवड

काळ्या गव्हाची लागवड कृषी विभागातील महाबळेश्वर येथील कृषी सहायक दीपक बोर्डे यांनी महाबळेश्वर येथील वाई,कोरेगाव,सातारा,खंडाळा,फलटण या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या शेतात केली आहे.यासाठी ५ क्विंटल बियाणे मागवत त्याची पेरणी केली होती.

” नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने उत्तम प्रतीचा गहू खावयास मिळणार असून,शेतकरी बांधवाना निश्चितच जास्तीचा आर्थिक फायदा या काळ्या गव्हापासून मिळू शकतो.- गणेश जांभळे,शेतकरी ,क्षेत्र महाबळेश्वर.

चवदार आणि आरोग्यदायी

काळा गहू खाण्यासाठी चविष्ट असून ,यामध्ये झिंक ,मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण इतर गव्हाच्या वाणांपेक्षा जास्त असून , ते शररीसाठी अतिशय उपयुक्त आहे.तसेच अँथोसायनीन या घटकाचे प्रमाण या 100-200 पीपीएम आहे. त्यामुळे शरीराची होणारी झीज भरून निघते. या गव्हामध्ये शर्करेचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेहासासख्या आजारामध्ये हा गहू फायद्याचा होऊ शकतो.तसेच,यातील घटक लठ्ठपणा,ताणतणाव कमी करण्यास मदत करतात.
कृषी आयुक्तालय,पुणे येथील फलोत्पादन विभागाच्या उपसंचालक धनश्री जाधव यांनी नावीन्यपूर्ण बाब म्हणून क्षेत्र महाबळेश्वर येथील पंढरीनाथ लांगी यांच्या काळ्या गव्हाच्या लागवडीची पाहणी केली.

लागवडीची वैशिष्टये

बियाणे कमी लागतेः गुंठ्याला 1किलो याप्रमाणे लागवड करण्यास सांगितले होते,परंतु फुटव्यांची संख्या जास्त असल्यामुळे 40 किलो बियांणांमध्ये सव्वा ते दीड एकरपर्यंत लागवड होऊ शकते.

पाण्याची बचत :कमी पाण्यामध्येसुध्दा अतिशय चांगल्या पध्दतीने गव्हाची वाढ होते.जास्त पाणी या वाणाला चालत नाही.
फुटव्याची संख्या जास्त :फुटव्याची संख्या ही सरासरी 8-13 फुटवे असल्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते.एकरी बियाणे कमी लागते.त्यामुळे बियाणाच्या खर्चात बचत होऊन शेतकरी बांधवांचे पैसे वाचणार आहेत.

तांबेरा रोगास बळी पडत नाही : जेथे या गव्हाची लागवड केली आहे,तेथे या गव्हावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला नाही.त्यामुळे औषध फवारणीच्या खर्चात बचत झालेली आहे. कमी उत्पादन खर्चामुळे शेतकरी बांधवाना निश्चतच जास्तीचा फायदा होणार असल्याचे कृषी सहायक दीपक बोर्डे यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या