महाड तारिक इमारत दुर्घटना : मुख्य आरोपी फारुख काझी अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाडमधील तारिक इमारत दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी फारूख काझी याला अटक करण्यात आली आहे. काझी याने माणगाव जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरणागती पत्करली असून महाड पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी संध्याकाळी घडलेल्या महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बांधकाम व्यवसायिक फारूक काझी फरार झाला होता. पोलीस फारूक काझीचा शोध घेत होते.

फारूक काझीची माहिती मिळावी म्हणून त्याच्या मुलाची तळोजा येथे जिल्हा पोलिसांकडून चौकशी सुरू होती. फारूक काझी याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.