विधानसभेच्या सर्वच जागा लढवणार! भाजपवर अवलंबून नाही – जानकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय समाज पक्षाचे गुजरातमध्ये 28 नगरसेवक आहेत, कर्नाटकमध्येही पक्षाने चांगली भरारी घेतली आहे. त्यामुळे आमचा पक्ष भाजपवर अवलंबून नाही. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्ष सर्वच 288 जागा लढवणार आहे, असे विधान रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी येथे करून भाजपवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

बदलापूर येथे गणरायाच्या दर्शनासाठी आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महादेव जानकर यांनी भाजप आणि मिंधे गटावर नाराजी व्यक्त केली. रासप हा पक्ष महायुतीमध्ये सहभागी आहे. मात्र आम्हाला जागावाटपात विश्वासात घेतले जात नाही. आमचा जनाधार मोठा आहे. त्यामुळे आम्हाला भाजपवर अवलंबून राहण्याची गरज नाही. महाराष्ट्रात प्रमुख चार पक्षानंतर आमचा क्रमांक लागत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आम्ही स्वबळावर लढवणार आहोत, असेही जानकर यावेळी म्हणाले.