
#MahaElection 2019 छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदम याने आज नगर विधानसभा मतदार संघातून बसपा पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाराजांचा अपमान करणारा श्रीपाद छिंदम नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. त्यानंतर त्याने आज नगर विधानसभा मतदारसंघातून बसपच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यासोबत त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यासह पक्षाचे पदाधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते. त्याच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्ज भरण्यासाठी म्हणून त्यांनी तहसील कार्यालयाच्या मागच्या गेटने प्रवेश केला होता.

























































