राज्यात दिवसभरात 43 हजार 697 कोरोना रुग्ण; 49 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी आज राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढला आहे. राज्यात दिवसभरात 43 हजार 697 कोरोना रुग्ण सापडले तर 49 जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईसह राज्यात ओमायक्रोनचे 214 रुग्ण सापडले आहेत. कोरोना आणि ओमायक्रोनचा संसर्ग राज्यात नियंत्रणात असला तरी आज दिवसभरात मंगळवारच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत साडेचार हजारांनी वाढ झाली आहे. मंगळवारी राज्यात 39 हजार 207 रुग्ण सापडले होते तर 53 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, राज्यात ओमायक्रोनचे 214 रुग्ण सापडले असून पुण्यात 158, मुंबईत 31, पुणे ग्रामीण 10, कल्याण-डोंबिवली आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 4, परभणी 2 तर नाशिक, वसई-किरार, संभाजीनगर, जळगाव आणि इतर राज्यांतून आलेल्या प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत 2074 रुग्ण सापडले असून 1091 जण ओमायक्रोनमुक्त झाले आहेत.