महाराष्ट्रात 60 टक्के मतदान! गावखेडय़ात उत्साह, शहरे थंडावली

718

एकीकडे देशात आर्थिक मंदी असताना विधानसभा निवडणुकीच्या मतदानातही मंदी आहे की काय असे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. राज्याची सत्ता कोणाकडे सोपवायची याचा निर्णय घेण्यासाठी राज्यातील जनतेने सोमवारी  आपला कौल मतदान यंत्रात बंद केला. मात्र गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा तीन टक्क्यांनी मतदान कमी झाले. राज्यभरात 60.46 टक्के मतदानाची नोंद झाली. मतदानाची घसरलेली ही टक्केवारी म्हणजे आर्थिक मंदी, महागाई, वाढती बेरोजगारी आणि जोडून आलेली सुट्टी याचेच हे साइड इफेक्ट्स असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे राज्याच्या ग्रामीण भागात भरघोस मतदान झाले; पण शहरांमध्ये मात्र मतदारांचा निरुत्साहच पाहायला मिळाला. 288 मतदारसंघांतील 3237 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आता 24 तारखेला जाहीर होणार आहे.

crowd-for-voting-maharashtr

ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बंदच्या 361 तक्रारी

दिवसभरात ठिकठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्याही तक्रारी आल्या. एकूण 361 तक्रारींपैकी काँग्रेसकडून 152 तर शिवसेनेकडून 89 ठिकाणी तर अन्य पक्षांकडून 120 ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी आल्या. प्रारूप मतदानावेळी 3445 ईव्हीएम  नादुरुस्त झाल्या तर प्रत्यक्ष मतदानावेळी 4698 ईव्हीएम नादुरुस्त झाल्या. त्यांच्या जागी तत्काळ पर्यायी ईव्हीएम बसविण्यात आल्या.

165 कोटींचा मुद्देमाल जप्त

राज्यात निवडणुकीच्या काळात आतापर्यंत 67 कोटी 52 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली तर 54 कोटी 50 लाख रुपयांचे सोने, 23 कोटी 21 लाख रुपयांची दारू, 20 कोटी 75 लाख रुपयांचे मादक पदार्थ असा 165 कोटी 99 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीस व आयकर विभाग व अबकारी शुल्क विभागाने जप्त केला.

आचारसंहिता भंग

राज्यात आचारसंहिता भंग झाल्याचे 2 हजार 124 गुन्हे दाखल करण्यात आले. त्याशिकाय प्रतिबंधात्मक कायदा. अन्न व औषध कायद्याखाली 11 हजार 506  गुन्हे दाखल करण्यात आले.

दोन जणांचा मृत्यू, एक रुग्णालयात

गडचिरोली जिह्यातील अहेरी मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी बापू पांडू गावडे (45) यांची तब्येत बिघडल्याने त्यांना हेलिकॉप्टरने चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर कोल्हापूरमध्ये निवडणुकीच्या कामावर नियुक्त केलेल्या सर्जेराव भोसले यांचा करवीर मतदारसंघात कार्यरत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचप्रमाणे ठाण्यातील रामबाग येथील नूतन शाळेत बंदोबस्तावर तैनात केलेले पोलीस कर्मचारी जयराम तर (48) यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने त्यांची प्रकृती सुधारत आहे.

नुकसानभरपाई

निवडणुकीच्या कामावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाला तर नुकसानभरपाई दिली जाते. या कर्मचाऱयांना प्रत्येकी सुमारे पंधरा लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी दिली.

  • पुण्यात पर्वती विधानसभा मतदारासंघातील दोन्ही हात नसलेल्या सुरेखा खुडे यांनी मतदान करून आपला हक्क बजावला. खुडे यांनी मतदान करून तरुणांना आणि मतदान न करणाऱयांना मतदान करण्याची प्रेरणा दिली आहे.
  • सांगली शहरातील मतदान केंद्रावर पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वृद्ध मतदारांसह तरुणांना पाण्यातून मार्ग काढत मतदान केंद्रापर्यंत पोहोचावे लागले.
  • इचलकरंजी शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील मतदान केंद्रावर तृतीयपंथीयांनी मतदानाचा हक्क बजावला.

मुंबईकरांची मतदानाला सुट्टी

2014च्या निवडणुकीत मुंबईने मतदानाची पन्नाशी गाठली होती. यंदा मात्र मुंबईकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली आणि सुट्टी एन्जॉय केली. 2014मध्ये मुंबई शहरात 55 टक्के तर उपनगरात 52 टक्के मतदान झाले होते. यंदा मात्र हा आकडा अनुक्रमे 48.63 आणि 51.17 पर्यंत पोहचला. रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आल्याने बहुतांश मुंबईकरांनी मतदानाच्या पवित्र कर्तव्याकडे पाठ फिरवून शहराबाहेर धूम ठोकल्याचेच हे चित्र आहे.

bride-for-voting-maharashtr

पावसामुळे अनेक मतदान केंद्रांवर चिखल झाला होता. बारामतीत मतदान केंद्राच्या अवतीभोवती झालेल्या चिखलातून वाट काढत मतदारांना जावे लागू नये म्हणून अशी शक्कल लढवली गेली. ट्रॅक्टरच्या ट्रॉली एकमेकांपुढे जोडून असा रस्ता बनवण्यात आला. मतदारांनी या ट्रॉलीचा वापर केला.

trolly-for-voting-booth-mah

सर्वाधिक मतदान करवीर 83.30 टक्के,सर्वात कमी मतदान कुलाबा 40.20 टक्के

सर्वाधिक मतदान कोल्हापूरमधील करवीर मतदारसंघात 83.30 टक्के इतके झाले. त्यापाठोपाठ शाहूवाडीत 80.19 टक्के, कागल 80.13 टक्के, रत्नागिरीत 75.59 टक्के, शिराळय़ात 76 टक्के  मतदान झाले तर सर्वात कमी मतदान कुलाब्यात 40.20 टक्के, त्यापाठोपाठ कल्याण पश्चिम 41.93 टक्के, अंबरनाथ 42.43 टक्के, उल्हासनगर 41.20 तर वर्सोव्यामध्ये 44.66 टक्के मतदान झाले.

thackeray-family-voting-201

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांनी वांद्रे पूर्व येथील नवजीवन विद्यामंदिर या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला.

हिंसाचाराचे गालबोट

  • वरुड मतदारसंघात स्वाभिमानी संघटनेचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर कथित गोळीबार व गाडी जाळण्याची घटना घडली. अमरावती मतदारसंघात आज सकाळी कॉंग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.
  • संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनाही धक्काबुक्की करण्यात आली.
  • नांदेड जिल्हय़ातील देगलूर किधानसभा मतदारसंघात, अंतापूर चैनपूर येथे कंचित बहुजन आघाडीचे उमेदकार प्रा. रामचंद्र भरांडे यांच्याकर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला.
  • जालना जिह्यात बदनापूर मतदारसंघातील अंबड तालुक्यात जामखेड गाकात भाजपा क राष्ट्रकादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये  हाणामारी झाली.
आपली प्रतिक्रिया द्या