शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, वाचा उदयन राजेंबद्दल काय म्हणाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

लोकांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष विनम्रतेने स्वीकारतो. सर्व पक्षांनी मनापासून सहकार्य केलं. आमच्या आघाडीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. सत्ता येते सत्ता जाते, पण किती टोकाची मतं मांडावी याची सीमा अनेकांनी ओलांडली होती. पण त्याबद्दल आता खोलात मी जाणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

आता सध्या तरी असे दिसते आहे की, पक्षांतर केली त्यांच्याबद्दल जनतेनी नकारात्मक भूमिका दिसून आली. लोक अशा लोकांबद्दल काय भूमिका घेतात हे आता स्पष्ट झाले आहे.

पक्षांतर करून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांच्या पिछाडीवर असण्याबद्दलही शरद पवार यावेळी बोलले. यावेळी त्यांनी उदयन राजेंचे नाव घेतले नाही. मात्र जनतेला टोकाची टीका पटत नाही आणि पक्षांतर करणाऱ्यांबद्दल त्यांना काय वाटते असे सांगतानाच ‘सातारच्या जनतेचा आभारी, त्यांनी श्रीनिवास पाटील यांना विजयी केलं. त्याबद्दल मी सातारला जाऊन लोकांचे आभार मानण्याचा प्रयत्न करणार आहे’, असेही ते म्हणाले.

सत्तेचा उन्माद जनतेला पटत नाही. लोकांना भाजप सरकारचा लोकांप्रति जो दृष्टीकोन आहे, त्याचा स्वीकार लोकांनी केला नाही, असे ते स्पष्ट शब्दांत बोलले.