राज्याच्या अर्थसंकल्पाची पर्यावरणपूरक पावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray-ajit-pawar

राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडण्यात आला. यावेळी शेतकरी, उद्योग, रस्तेविकास आणि रोजागार निर्मितीवर जोर देण्यात आला आहे. राज्याच्या यंदाच्या विकासात पर्यावरणासाठी म्हणून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. पर्यावरण विभागास रुपये 230 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत.

तसेच ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंज याकरिता उपाययोजना राबविण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे.

या सोबतच नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी, नद्या स्वच्छ करण्यावर जोर देण्यात येणार आहे. नदी प्रदूषण प्रतिबंधक प्रकल्पाच्या अनुषंगाने नाग, इंद्रायणी, वालधुनी या नद्यांमध्ये सोडण्यात येणारे सांडपाणी अडवणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र स्थापन करणार आहेत.