विधानसभा तालिका अध्यक्षांची नियुक्ती

503

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदांची घोषणा केली. सदस्य संजय शिरसाट, चिमणराव पाटील, अनिल भाईदास पाटील, संग्राम थोपटे, कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली.

विधानसभेच्या कामकाजाला वंदे मातरम्‘ने सुरुवात

दरम्यान, सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाला विधानसभेमध्ये ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करण्यात आली.

दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली

विधानसभेचे दिवंगत सदस्य पुष्पसेन भिवाजी सावंत व किसनराव बबनराव राऊत यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकप्रस्ताव मांडला. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आदींनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या