उद्या ते विधानसभेत थुंकायलाही कमी करणार नाहीत, काँग्रेसची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विरोधक अनेक मुद्द्यांवरून आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. अशातच अल्पसंख्यांकमंत्री अब्दुल सत्तार यांचा विधीमंडळातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली आहे.

विधान परिषदेत राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई निवेदन करत होते. त्याचवेळी त्यांच्या मागे बसलेल्या अल्पसंख्याक विकास विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खिशातून एक एक पुडी बाहेर काढून त्यातील काहीतरी खाताना दिसत आहेत. त्याचा व्हिडीओ महाराष्ट्र काँग्रसेने ट्वीट केला असून त्यावरून राज्य सरकारवर निशामा साधला आहे.

”विधानसभेत चर्चा सुरू असताना सत्तार महोदयांनी थेट पुडी काढून तोंडात टाकली आणि निर्धास्तपणे चघळत बसले. आज विधानसभेत पुडी खाऊन चगळतायत उद्या तिथे थुंकायलाही कमी करणार नाहीत. शिंदे-फडणवीस सरकारच्या आमदारांना विधानसभा पानाची टपरी वाटते का?”, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.