राज्यात दिवसभरात 3 हजार रुग्ण कोरोनामुक्त, नव्या 4259 रुग्णांना कोरोनाचे निदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या आता वाढत चालली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात एकूण 3 हजार 949 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागाने जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील आता 93.46 टक्क्यांवर पोहचले आहे. दरम्यान, शनिवारी दिवसभरात 4 हजार 259 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत एकूण 1 कोटी 16 लाख 38 हजार 336 जणांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 16.13 टक्के म्हणजेच 18 लाख 76 हजार 699 नमुने पॉझेटिव्ह आले आहेत. तर गुरुवारी दिवसभरात एकूण 80 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृत्यू दर 2.57 टक्के इतका आहे.

दरम्यान, राज्यभरात ऑक्टिव रुग्णांची संख्या 73 हजार 542 इतकी आहे. तर राज्यात एकूण 5 लाख 25 हजार 623 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 500 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.