राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली, दिवसभरात 5,572 कोरोनामुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबवण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात आज दिवसभरात 5 हजार 572 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.54 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 18 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आज दिवसभरात कोरोनामुळे 68 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.56 वर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 26 लाख 754 चाचण्या झाल्या असून 19 लाख 25 हजार 66 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 89 हजार 560 जण होम कोरेंटाईन असून 3 हजार 204 जण संस्थात्मक कोरेंटाईन आहेत.