
मला बोरिवलीमधून तिकीट का दिले नाही याचे मी आत्मपरीक्षण करीत आहे, अशी कबुली विनोद तावडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मात्र त्याचवेळेस पक्षाचे काही चुकले असेल तर पक्षही विचार करील, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
माझ्याविषयी काही चुकीच्या माहितीमुळे निर्णय झाला असेल तर तो पण दुरुस्त करेन. तिकीट वाटपाच्या संदर्भात ते म्हणाले की, पक्षात माझे कोणी स्पर्धक नाहीत. त्यामुळे पक्षाचे निर्णय हायकमांड घेत असतात. त्यामुळे आम्ही एक टीम म्हणून काम करतो. निवडणूक झाल्यावर पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, संघटनमंत्री संतोष कुमार यांची भेट घेऊन चर्चा करेन, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
























































