
बईत विधानसभेच्या 36 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमदारकी लढवणारे दहा पैकी चार नगरसेवक विजयी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे रमेश कोरगावकर, दिलीप (मामा) लांडे तर भाजपचे पराग शाह, ‘सपा’चे रईस शेख विजयी झाल्याने पालिकेतून विधानसभेत पोहोचले आहेत.
पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या कामाचा ठसा उमटवल्यामुळे दहा नगरसेवकांना संबंधित पक्षांकडून आमदारकीचे तिकीट देण्यात आले. यामध्ये नऊ नगरसेवकांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली, तर एका नगरसेविकेने अपक्ष म्हणून निकडणुकीचा अर्ज भरला होता. यामध्ये पक्षाकडून मिळालेल्या अधिकृत तिकिटांमध्ये मुंबईचे विद्यमान महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर (वांद्रे पूर्व) यांच्यासह शिवसेनेकडून रमेश कोरगावकर (भांडुप पश्चिम), दिलीप लांडे (चांदिवली), काँग्रेसकडून आसिफ झवेरिया (वांद्रे पश्चिम) आणि जगदीश कुट्टी (अंधेरी पूर्व) यांना उमेदवारी देण्यात आली होती. ‘मनसे’कडून संजय तुर्डे (कालिना), समाजवादीकडून पालिका गटनेते रईस शेख (भिकंडी), अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी (भायखळा), भाजपकडून पराग शाह (घाटकोपर पूर्व) यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर राजुल पटेल यांनी (वर्सेवा) येथून अपक्ष फॉर्म भरला होता.
माजी नगरसेवकांमध्ये एकाची बाजी
विद्यमान नगरसेवकांसह सात माजी नगरसेवकही आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव (भायखळा) या एकमेव माजी नगरसेविका विजयी झाल्या. मात्र शिवसेनेकडून लढलेले विठ्ठल लोकरे (मानखुर्द-शिवाजीनगर), काँग्रेसचे सुरेश कोपरकर (भांडुप पश्चिम), अंजता यादव (कांदिवली पूर्व, भाजपकडून मुरजी पटेल (अंधेरी), मनसेकडून संदीप देशपांडे (माहीम), राष्ट्रवादीकडून धनंजय पिसाळ (विक्रोळी) हे पराभूत झाले आहेत.
पराभूत नगरसेवक
- विश्वनाथ महाडेश्वर (शिवसेना)
- राजुल पटेल (अपक्ष)
- गीता गवळी (अखिल भारतीय सेना)
- जगदीश कुट्टी (काँग्रेस)
- आसिफ झकारिया (काँग्रेस)
- संजय तुर्डे (मनसे)


























































