राज्यात लॉकडाऊनच्या काळात 39 हजार बेरोजगारांना रोजगार – नवाब मलिक यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असली तरी राज्याच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यात विविध ठिकाणी रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्याच्या माध्यमातून एकट्या जुलै महिन्यात 21 हजार 572 बेरोजगारांना रोजगार मिळाला अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज दिली. लॉकडाऊनच्या या संपूर्ण काळात तब्बल 39 हजार 287 बेरोजगारांना रोजगार मिळाला. त्यापूर्वी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार मिळाला.