महाराष्ट्रात देशातील पहिली ‘रोग नियंत्रण व प्रतिबंध संस्था’ स्थापन करणार

418

केंद्राच्या धर्तीवर राज्यात रोगप्रतिबंधक व नियंत्रण संस्था स्थापन करण्याचा विचार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालये व त्यांना संलग्न असलेल्या 23 रुग्णालयांचे मजबुतीकरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

चीनमधून सुरू झालेल्या ‘कोरोना’ या संसर्गजन्य रोगामुळे जगभर हाहाकार उडवून दिला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा विकसित करण्याची आवश्यकता आहे. सध्या केंद्रीय पातळीवर दिल्लीत अशी संस्था असून राज्यपातळीवर रोगनियंत्रण व प्रतिबंध संस्था निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितले. या संस्थेचे स्वरूप कसे असावे व इतर तपशील ठरविण्यासाठी संबंधितांशी चर्चा करण्यात येणार असून लोकांच्याही सूचना मागवणार असल्याचे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या