थकबाकीदारांसोबत राज्य बँक करणार वन टाइम सेटलमेंट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralaya-5

थकीत कर्जाच्या वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कंबर कसली आहे. गेल्या चार वर्षांपासून ज्या कर्जाची वसुली न झाल्याने ती अनुत्पादक (एनपीए) ठरली आहेत. वर्षानुवर्षे थकीत असलेल्या या कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने वन टाइम सेटलमेंट योजना आणली आहे. त्यानुसार थकीत कर्ज प्रकरण जेव्हा एनपीए ठरले तेव्हापर्यंतच्या मुद्दल आणि व्याजाच्या रकमेवर सरळ पद्धतीने केवळ आठ टक्के व्याज आकारले जाणार आहे.

गेल्या चार वर्षांत सहाशे कोटी रुपयांपैकी एकही रुपया वसूल झालेला नाही. त्याचा परिणाम बँकेवर होत आहे. त्याची दखल घेऊन बँकेने एनपीए होऊन डी-1 वर्गात गेलेल्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी वन टाइम सेटलमेंट योजना सहकार आयुक्तांच्या मंजुरीने आणल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांनी सांगितले.

z बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सुरू केलेली वन टाइम सेटलमेंट योजना मार्च 2020पर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे कर्जदाराला याचा थेट फायदा होणार आहे. त्यामुळे संबंधित कर्जदारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेने केले आहे.