काँग्रेसशी गद्दारी करणाऱ्यांना मोटारीतून बाहेर काढून लाथा घाला, सुनील केदार यांची चिथावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसशी गद्दारी करणाऱया नेत्यांना मोटारीतून बाहेर काढा आणि लाथा घाला, असे वक्तव्य राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी नागपुरात केले आहे. त्यामुळे माजी आमदार आशीष देशमुख व सुनील केदार यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

नागपूरमध्ये सुनील केदार व आशीष देशमुख यांच्यात वाद आहे. जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रोखे घोटाळा प्रकरणात सुनील केदार यांच्यावर आशीष देशमुख यांनी आरोप केला आहे. सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी आशीष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सुनील केदार यांनी आगामी जिल्हा परिषद पोटनिवडणुका व बाजार समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी करणाऱयांना धडा शिकवा. मग तो नेता कितीही मोठा असला तरी त्याला लाथा घाला. मलाही त्या ठिकाणी बोलवावे. मंत्रीपद सोडून मी त्या ठिकाणी येईन. पोलीस केस झाली तरी चिंता करू नका, मी पाहून घेईन अशी कार्यकर्त्यांना चिथावणी दिली.