निवडणुकीच्या दिवशी ‘नो’ एक्झिट पोल

696

महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणूक होत असून त्याचवेळी देशातील 17 राज्यांमध्ये 51 ठिकाणी पोटनिवडणुका होणार आहेत. मतदानाच्या दिवशी 21 ऑक्टोबरला सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत एक्झिट पोलला परवानगी नसल्याचे निवडणूक आयोगाने मंगळवारी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाचे प्रवक्ते शेफाली शरन यांनी आयोगाच्या अधिकृत ट्विटर खात्यावर ही घोषणा केली. हरयाणामधील 90 जागांसाठी 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होत असून त्याच दिवशी महाराष्ट्रात 288 जागांसाठीही निवडणूक होणार आहे. याच दिवशी देशातील 17 राज्यांत पोटनिवडणुका होतील.

आपली प्रतिक्रिया द्या