बारावीचा उद्या निकाल? आज घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाच्या तारखेची घोषणा उद्या रविवार, 1 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल 2 ऑगस्टपर्यंत जाहीर होईल, अशी शक्यता शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

सर्वेच्च न्यायालयाने बारावीचा निकाल 31 जुलैपूर्वी जाहीर करण्याचे निर्देश दिले होते; परंतु राज्यात मागील आठवडय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमधून काही माहिती न मिळाल्याने निकाल जाहीर करण्यास उशीर झाल्याचे मंडळातील अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले.

मात्र आता मंडळाची निकाल जाहीर करण्यासाठी तयारी पूर्ण झाली असल्याने हा निकाल सोमवारपर्यंत जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान, केंद्रातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याने त्याचा मोठा फटका राज्यातील विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.