‘महाराष्ट्र केसरी’ अभिजित कटके यांच्या घरी चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान अभिजित कटके यांच्या बंगल्यातून नेपाळी सुरक्षारक्षकाने तब्बल 29 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. त्यामध्ये 10 लाखांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने आहेत. अभिजितचे वडील चंद्रकांत कटके सोमवारी पहाटे चारच्या सुमारास व्यायामाला गेले होते. नेमकी ही संधी साधून त्यांच्या बंगल्याचा सुरक्षारक्षक असलेल्या नेपाळी चोरटय़ाने साथीदाराच्या मदतीने बंगल्याच्या खिडकीच्या ग्रिलचे स्क्रू काढून आत प्रवेश केला. त्यानंतर सोन्याचे दागिने, चांदी, तसेच रोख 10 लाख रुपये असा एकूण 28 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.