दूध दरवाढ आंदोलनाचा भडका कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यामध्ये दूध दरवाढीचा भडका कायम असून, गेले सहा दिवस डॉ. अजित नवले यांचे नगर जिह्यातील अकोले येथे आमरण उपोषण सुरू आहे. अद्यापि याच्यावर कोणताही तोडगा निघाला नसून, आंदोलन दिवसेंदिवस तीक्र होत आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज उपोषणस्थळी उपस्थित राहत पाठिंबा जाहीर केला. दरम्यान, दूध आंदोलन तीक्र होत असून, दूध उत्पादक शेतकऱयाने येथील तहसील कार्यालयाच्या आवारात शेकडो गायी बांधत प्रशासनाचा निषेध केला, तर माढा शहरामधील इंदिरा गांधी चौकात शेतकऱयांनी ‘रास्ता रोको’ करीत गायीलाच दुधाने आंघोळ घालत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.

‘तहसील’च्या आवारात गायी बांधल्या

अकोले येथे डॉ. अजित नवले आणि त्यांचे सहकारी संदीप दराडे व अंकुश शेटे गेले सहा दिवस उपोषणाला बसले आहेत. त्यावर अद्यापि कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱयांनी एकत्रितपणे येऊन अकोले तहसील कार्यालयाच्या आवारात गायी बांधत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत दुधाला वाढ द्या, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

गायीला दुधाची आंघोळ

राज्यामध्ये दूधदरवाढीसाठी आंदोलन तीक्र होत आहे. या पार्श्वभूमीवर दुधाला दरवाढ मिळण्यासाठी आज माढा तालुक्यातील शेतकऱयांनी शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली माढा शहरामधील इंदिरा गांधी चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत गायीलाच दुधाने आंघोळ घालत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी बबन उबाळे, आबा साठे, रणजित भांगे यांच्यासह उपळाई, जाधववाडी, विठ्ठलवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

अजित नवले यांचे उपोषण सुरूच मकरंद अनासपुरे यांचा आंदोलनाला पाठिंबा

दुधाला भाव वाढून मिळावा, या मागणीसाठी डॉ. अजित नवले यांनी सहा दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आज त्यांची भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला. अनासपुरे म्हणाले, अजित नवले यांनी जी भूमिका मांडली आहे, ते अतिशय योग्य आहे. वास्तविक पाहता, काबाडकष्ट करणारा हा शेतकरीवर्ग आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या दुधाला दर नाही. त्यामुळे दुधाला 28 रुपयांवरून पाच ते सहा रुपये दरवाढ द्यावी, अशी मागणी केलेली आहे. ती मागणी रास्त आहे. जर आपण आज 50 व 60 रुपये लिटर दूध विकत घेतो, मग जो मूळ शेतकरी आहे, त्याला त्याचा फायदा व्हायला नको का? असा सवाल अनासपुरे यांनी व्यक्त करीत शेतकऱयांना पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.

मिलिंद नाईकवाडी, डॉ. मोहन पवार, तुळशीराम कातोरे, महेश सोनवणे, राम एखंडे, शुभम आंबरे, भीमाशंकर मालुंजकर, सुनील लोखंडे, नितीन डुंबरे, नीलेश गवांदे, दीपक पथवे, संदीप शेणकर, राहुल शेटे, किशोर शिंदे, सत्यम भोर, अतुल लोहटे, संतोष भोर, राजेंद्र भोर, माणिक पांडे, नानासाहेब धुमाळ आदी दूध उत्पादक आंदोलनाचे संचालन करीत आहेत.