तळीरामांची ‘ब्रेथ ऍनालायजर’ चाचणी बंद

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी दारू पिऊन गाडी चालविणाऱया तळीरामांची ‘ब्रेथ ऍनालायजर’ चाचणी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्वसनाद्वारे या व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून मद्यपी वाहन चालकांची चाचणी तूर्तास थांबविण्याचा आल्याची माहिती महामार्ग अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) विनय करगावकर यांनी परिपत्रक काढून दिली आहे.

दारू पिऊन वाहन चालविणाऱयांच्या तपासणीसाठी वापरण्यात येणाऱया यंत्रामुळे श्वसनाशी संबंधित संसर्गाचा प्रसार होण्याचा धोका संभवतो. खबरदारीची उपायोजना म्हणून कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने वाहनचालकांची तपासणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मद्यपी वाहनचालकांची तपासणी पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलिसांनी याबाबत काढलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

संशयितांची रुग्णालयात तपासणी

कोरोनाचा क्हायरस संसर्गजन्य आहे. त्यामुळे काहतूक किभागाकडे असलेल्या ब्रेथ ऍनालायझर यंत्राचा कापर सध्या थांबवला आहे. त्याऐकजी आता मद्य पिऊन गाडी चालवत असताना कोणी संशयित आढळला तर त्याला नजीकच्या रुग्णालयात नेऊन डॉक्टरांकडून त्याची तपासणी केली जाते.

आपली प्रतिक्रिया द्या