महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार एक दिवसाचे वेतन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या आपत्तीमुळे सर्वत्र हाहाकार माजवला असुन केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसंच सर्व प्रशासकीय यंत्रणा कोरोनाला रोखण्यासाठी सज्ज आहेत. यंत्रणांना साहाय्य करण्यासाठी अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येत आहेत. सध्याचा राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व त्यावर उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक एक दिवसाचे वेतन देणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली आहे.

सध्या आपल्या राज्यासह देशात व जगात कोरोनाने थैमान घातले असून या विषाणूमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असुन अनेक लोक या कोरोना विषाणूमुळे त्रस्त असून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाला प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील प्राथमिक शिक्षक एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे तांबारे यांनी सांगितले.

या मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचिटणीस आप्पासाहेब कुल, राष्ट्रीय सचिव बाळासाहेब झावरे, एन. वाय. पाटील, मोहन भोसले, विनोद राऊत, कोषाध्यक्ष जनार्धन निऊंगरे व महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अनुराधा तकटे यांनी केले आहे.