
राज्य सरकारने राज्यातील जनतेला खूशखबर दिली आहे. कोरोनाचा संसर्ग उतरणीला लागल्यामुळे राज्यात सोमवारपासून अनलॉकची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे अर्थचक्राला पुन्हा एकदा गती मिळणार आहे. अनलॉकसाठी राज्य सरकारने पाच स्तर तयार केले केले आहेत. पाच टक्के पॉझिटिव्ही दर असलेल्या जिल्ह्यांचा समावेश पहिल्या स्तरात केला असून या जिल्हय़ांमध्ये पूर्णपणे अनलॉक केला आहे. अनलॉकचे पाच टप्पे जाहीर केले असले तरी पाचव्या टप्प्यात सध्या एकही जिल्हा नाही. मात्र ज्या जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढेल त्या जिह्याचा समावेश पाचव्या गटात केला जाईल.
1 पहिला टप्पा
नगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
n सर्वच व्यहार- व्यवसाय सुरू ठेवण्यास मुभा
2 दुसरा टप्पा
हिंगोली, नंदूरबार
n दुकाने व आस्थापने पूर्ण क्षमेतेने.
n सार्वजनिक जागा, मोकळी मैदाने, सकाळ-संध्याकाळचा वॉक, सायकलिंगची मुभा.
n खासगी व सरकारी कार्यालये – पूर्ण क्षमतेने.
n माँल-चित्रपटगृहे, मल्टिफ्लेक्स, रेस्टॉरंट – 50 टक्के क्षमतेने .
n मेळावे-सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन क्षेत्र – 50 टक्के क्षमतेने.
n लग्नसोहळा- हॉलच्या क्षमतेच्या 50 टक्के, कमाल मर्यादा 100.
n अंत्यसंस्कार – उपस्थितीवर मर्यादा नाही.
n जीम, सलोन, ब्युटी सेंटर, स्पा, वेलनेस सेंटर- 50 टक्के क्षमतेने (अपाँईंटमेंट घेऊन).
n सार्वजनिक वाहतूक – 100 टक्के मात्र उभ्याने प्रवास करण्यास मनाई.
3 तिसरा टप्पा
अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, भंडारा, गडचिरोली, मुंबई, नाशिक, धाराशीव, पालघर, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम
n दुकाने व आस्थापने – संध्याकाळी चार वाजेपर्यंत.
n सार्वजनिक जागा, मोकळी मैदाने, वाँक, सायकलिंग- दररोज पहाटे 5 ते सकाळी 9.
n खासगी व सरकारी कार्यालये – 50 टक्के उपस्थिती.
n रेस्टॉरंट- संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने, त्यानंतर पार्सल, टेकअवे व होम डिलिव्हरीला मुभा.
n मॉल-चित्रपटगृहे, मल्टिफ्लेक्स पूर्णपणे बंद.
n मेळावे-सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन क्षेत्र- 50 टक्के क्षमतेने संध्याकाळी 4 पर्यंत मुभा. (शनिवार-रविवार परवानगी नाही).
4 चौथा टप्पा
बुलडाणा, कोल्हापूर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
n अत्यावश्यक दुकाने व आस्थापने – संध्याकाळी चार वाजेपर्यंत. अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने व आस्थापना – बंद.
n रेस्टॉरंट- फक्त पार्सल, टेकअवे व होम डिलिव्हरी.
पहिला टप्पा
नगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ
दुसरा टप्पा
हिंगोली, नंदुरबार
तिसरा टप्पा
अकोला, अमरावती, संभाजीनगर, बीड, भंडारा, गडचिरोली, मुंबई, नाशिक, धाराशीव, पालघर, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम
चौथा टप्पा
बुलडाणा, कोल्हापूर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
मालिका, चित्रपट चित्रीकरणाला परवानगी
ज्या ठिकाणी कोरोना नियंत्रणात आला आहे अशा ठिकाणी चित्रीकरणाला सशर्त परवानगी दिली आहे. त्यात मुंबईचा समावेश आहे. ही चित्रीकरणे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करता येणार आहेत. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱयांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक आहे. म्हणजे चित्रीकरण अशा ठिकाणी करावे लागेल की, जिथे निर्मात्यांचे नियंत्रण असेल. चित्रीकरण सुरू असेपर्यंत त्यात सहभागी असलेल्या कुणालाही तिथून बाहेर जाता येणार नाही.



























































