
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दुसऱ्या पर्वाला 7 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कॉमेडी शो ने महाराष्ट्राला पोटभर हसायला भाग पाडून महाराष्ट्राला फिट आणि फाइन ठेवले. मजेशीर, भन्नाट विनोदवीरांनी या मंचावर एकापेक्षा एक अफलातून कॉमेडी स्किट सादर करुन हास्यकल्लोळ केला. दुसऱ्या पर्वात जजेस सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्यासोबत आता अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारेसुद्धा सहभागी होणार आहेत. तसेच हा कार्यक्रम आता दोन दिवसांऐवजी चार दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा-कॉमेडीचे जहागिरदार’ हा फॉरमॅट असून महेश कोठारे या दोन दिवसांचे परफॉर्मन्स जज करणार आहेत. सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर,पॅडी कांबळे, अरुण कदम आणि अंशुमन विचारे हे सहा सेलिब्रिटी कलाकार आणि 8 नवीन कॉमेडियन्स/ विनोदी कलाकार एकत्र परफॉर्मन्स करणार आहेत. सर्व कलाकार मंडळी बुधवार आणि गुरुवारला कार्यक्रमाच्या दुस-या सेलिब्रिटी फॉरमॅटमध्ये कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाचे विजेते या दोन दिवसांत स्किट सादर करणार आहेत. या फॉरमॅटचे परीक्षण सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक करणार असून ‘परफॉर्मर ऑफ दि वीक’देखील तेच निवडणार आहेत.



























































