
राज्यातील मिंधे-फडणवीस-अजित पवार या सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी महविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडीकडून ‘होऊ दे चर्चा’ नावाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यामुळे मिंधे सरकार चांगलेच टरकले असून ठाण्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. याविरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं आहे.
महाविकास आघाडीनं निवेदनात स्पष्ट केलं आहे की, ‘आमच्या कॉर्नर मीटिंग होणारच, हिम्मत असेल तर अडवून दाखवा’. तसेच रोखण्याचा प्रयत्न केला तर महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते पोलीस ठाण्याला घेराव घालतील, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.




























































