
कोरोना काळात विजेचे भरमसाठ बिल आल्यानं ते एकावेळी भरणं ग्राहकांना अवघड होऊ लागले आहे. त्यामुळे ही थकबाकी वाढत चालली आहे.
शासन वीज बिलात सूट देईल, या आशेनेसुद्धा अनेकांनी बिलं भरलेली नाहीत. पण आता ही वीज बिलं वसूल करण्याची मोहीम महावितरण कंपनीने सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चंद्रपूर शहरात सायकल रॅली काढली.
या रॅलीच्या माध्यमातून बिलांचा भरणा लवकर करा, असा संदेश देण्यात आला. शिवाय शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, त्याचा लाभ घेण्याचं आवाहनही यानिमित्तानं करण्यात आलं.



























































