निवडणुकीतील विजय हेच निलंबनाला उत्तर; महुआ मोईत्रा यांचा जोरदार प्रचार

टीएमसीच्या नेत्या आणि पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या महुआ मोइत्रा यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकसभेतून निलंबित करण्याला विजयानेच उत्तर देणार असल्याचे महुआ यांनी म्हटले आहे. भाजपापासून लोकशाहीला मोठा धोका असल्याचेही मोईत्रा यांनी म्हटले आहे.

आज आपल्या मतदारसंघात प्रचार करताना महुआ मोइत्रा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला जिंकण्याबद्दल कुठलीही शंका नाही. मी लोकांमध्ये फीरून मतदारसंघातील विविध समस्यांचा आढावा घेत आहे. दरम्यान, महुआ मोइत्रा गेल्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीच्या तिकीटावरच निवडणुक जिंकल्या होत्या. लोकसभेतून निलंबित करून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱयांनी केला. मात्र, याला मी माझ्या विजयातूनच उत्तर देईन असा निर्धार महुआ मोईत्रा यांनी बोलून दाखवला.