भिवंडीत भीषण आग, भंगाराच्या 15 गोदामांची राख

भिवंडीत गुरूवारी रात्री अवचीपाडा भागात भीषण आग लागली. या आगीतम भंगाराचे 15 गोदाम भस्मसात झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

तब्बल 5 तासांच्या परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या