मालाडमध्ये गाळ्यांना भीषण आग

सामना प्रतिनिधी । मुंबई

मालाड पश्चिम बॉम्बे टॉकीज परिसरातील गाळय़ांना आज सकाळी 11.30 च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या ठिकाणी काम करणाऱया कामगारांनी तातडीने बाहेर धाव घेतल्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र या आगीत काही गाळे भस्मसात झाल्याने मोठी वित्तहानी झाली.

मालाडमधील एन. एल. रोडकरील सोमकार बाजार परिसरात बॉम्बे टॉकीज कंपाऊंडमध्ये केमिकल आणि लाकडी कस्तू तयार करण्याचे अनेक गाळे आहेत. शिवाय परिसरात रहिकासी इमारतीही आहेत. या कंपाऊंडमधील एका गाळय़ात मेटलला केमिकल पाकडरचे कोटिंग करण्याचे काम सुरू असताना शॉर्टसर्किट होऊन आगीची ठिणगी पडली. त्यामुळे केमिकलने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आवश्यक साधनसामग्रीसह घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. येथील चिंचोळय़ा रस्त्यामुळे घटनास्थळी पोहचलेल्या जकानांना आग किझकण्यासाठी मोठी कसरत कराकी लागली. यावेळी मोठय़ा प्रमाणात धूर आणि आगीचे लोळ परिसरात पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. या मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडीही झाली. अग्निशमन दलाच्या जकानांनी अथक प्रयत्न करून 4 फायर इंजिन, 3 जम्बो टँकर, 1 कॉटर टँकरच्या सहाय्याने दुपारी 12 काजून 57 मिनिटांनी आग आटोक्यात आणली.