हिमाचल प्रदेशमधील खिचडीचा ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये विक्रम

486

हिमाचल प्रदेशामध्ये 1995 किलोची खिचडी एकाच भांड्यात बनवण्यात आल्याचा नव्या विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. हिमाचलमधील मंडी जिल्ह्यातील तत्तापानीमध्ये मकर संक्रांतीनिमित्त एकाच भांड्यात 1995 किलो खिचडी बनवण्यात आली. या आधी एकाच भांड्यात 918 किलो खिचडी बनवण्यात आली होती. त्याचीही विश्वविक्रमात नोंद झाली होती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषीनाथ यांच्यासमोरच खिचडीच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली.

ही खिचडी बनविण्यासाठी 405 किलो तांदूळ, 190 किलो डाळ, 90 किलो तूप, 55 किलो मसाले व 1100 लीटर पाणी वापरण्यात आले.  25 शेफनी पाच तास मेहनत करून  ही खिचडी बनवली. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या तत्तापानीतील खिचडी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. त्यामुळे खिचडी बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य शेफ एन.एल.शर्मा यांनी सांगितले. हिंदुस्थानातील खिचडीने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे, असे ऋषीनाथ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या