
सामना ऑनलाईन । मुंबई
अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतेच ते दोघेही मालदीव येथून परतले आहेत. तेथून परत येताच ते दोघे एकत्र लिलावती रुग्णालयात गेले होते. त्यांच्या रुग्णालय भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून नेटकऱ्यांनी काही गूड न्यूज तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे.

मलायकाचा अरबाज खान सोबतचा घटस्फोट झाल्यानंतर तिचे अर्जुन कपूरसोबत अफेयर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर अनेकदा ते एकत्र दिसले. त्या दोघांकडून याबाबत काहीच सांगण्यात आलेले नाही. मात्र मलायक व अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत हे जवळपास स्पष्ट झालेले आहे. हे दोघे 19 एप्रिलला लग्न देखील करणार असल्याची चर्चा रंगली होती.



























































