मलायका-अर्जुन कपूरच्या लग्नाच्या प्रश्नावर अरबाज खळखळून हसला आणि म्हणाला…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर लग्न करणार असल्याच्या वावड्या सध्या उठल्या आहेत. येत्या 19 एप्रिलला दोघे लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. या प्रश्नावर कपूर कुटुंबाने मौन धारण केले असले तरी एका कार्यक्रमादरम्यान मलायकाचा एक्स पती अरबाज खान याने उत्तर दिले आहे.


View this post on Instagram

Repost @lnbolly Arbaaz reaction on Arjun and Malaikas marriage

A post shared by instabollywoodfc (@lnstabollywoodfc) on

एका कार्यक्रमामध्ये अरबाजला मयालका आणि अर्जुन कपूर यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्याने उत्तर टाळून हसण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अरबाज प्रश्न विचारण्याचा म्हणतो की, तू खूपच मस्त प्रश्न विचारला आहेस. यामागे तू खूप मेहनत घेतली असेल. संपूर्ण रात्र बसून यावर विचार केला असेल. तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देईल मी. परंतु तू एवढा वेळ घेतला प्रश्न विचारायला, मलाही वेळ द्यायला हवा ना. उद्या सांगतो. चालेल ना? असे अरबाज खान म्हणतो.

ती तर अफवा
याआधी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नाबाबत बोनी कपूरला विचारले असता त्याने ही एक अफवा असल्याचे म्हटले होते. या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे बोनी कपूर म्हणाले. तसेच मलायका अरोरा हिनेही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. परंतु मलायका मालदिवमध्ये लग्नापूर्वी सुट्टीची मजा घेत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे नक्की काय ते काही दिवसात कळलच.


View this post on Instagram

A perfect way to begin my day …. jus dive in‍♀️ @niyamamaldives #paradise#inlovewithmaldives

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on