मलायका अरोराचा बेडरूम व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मलायका अरोरा नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असते. कधी आपल्या ड्रेसिंगमुळे तर कधी अर्जुन कपूरसोबतच्या नात्यामुळे. वयाच्या पन्नाशीतही तिने राखलेला फिटनेस हाही चर्चेचा विषय असतो.

आता मलायका तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सगळ्या कलाकारांनी चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छा देण्याची पद्धत कलाकारागणिक वेगळी होती. मलायकानेही तिच्या पद्धतीने नवीन वर्षाचा पहिला दिवस साजरा करत असतानाचा व्हिडीओ पोस्ट केला.

हा व्हिडीओ झोपेतून उठतानाचा होता. आपल्या अंथरूणात जागं होऊन मलायकाने गुड मॉर्निंग अशी कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

या बोल्ड व्हिडीओवर चाहत्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. एरवी जे नेटकरी तिला ट्रोल करतात त्यांनी तिच्या अशा शुभेच्छांची मस्करी करत तिला लवकर उठत जा असं सांगून तिच्या व्हिडीओला दाद दिली आहे.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)