
राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेच्या झालेल्या माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नीलकंठेश्वर पॅनेलची सरशी होताना दिसत आहे. पहिल्या फेरीतील मिळालेल्या मतांच्या आकडेवारीनुसार आठ जागांपैकी सात जागांवर अजित पवारांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत. जवळपास निम्मी मते मोजायची शिल्लक असून त्यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्गातून विजय मिळवून विजयाचा गुलाल उधळला. ‘ब’ वर्गात 101 पैकी 91 मते अजित पवार यांना तर विरोधी भालचंद्र देवकाते यांना 10 मते मिळाली. अनुसूचित जाती व जमाती, महिला राखीव, भटक्या विमुक्त जाती, इतर मागास प्रवर्ग यांची पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली असून, या फेरीत सत्ताधारी श्री नीलकंठेश्वर पॅनेलचे सर्व उमेदवार आघाडीवर असून विरोधी गटातील उमेदवारांमध्ये 400-500 मतांचे अंतर आहे.
z मुख्य 6 गटातील मतमोजणी बाकी असून, माळेगाव गटात अजित पवार गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी बुधवार पहाट होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली