रडणाऱ्या मुलाला सांभाळण्याच्या बहाण्याने घरी बोलावले, दोघांनी बलात्कार केल्याने मुलगी गर्भवती राहिली

5576

14 वर्षांच्या एका मुलीवर वारंवार बलात्कार केल्याने ती गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार मलकापूरमध्ये घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यातील एका आरोपीचं वय हे 55 वर्षे तर दुसऱ्या आरोपीचे वय 35 वर्षे इतके आहे. पीडीत मुलगी ही या दोघांच्या शेजारीच राहाते. ‘आपल्या घरातील मूल रडतं आहे त्याच्यासोबत खेळण्यासाठी येतेस का ? तुला चॉकलेट घेऊन देईन’ असं विचारून या दोघांनी या मुलीला घरी बोलावलं होतं. घरात आल्यानंतर या दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेचा धाक दाखवत दोघांनी एकापेक्षा जास्तवेळ तिच्यावर बलात्कार केला, ज्यामुळे ही मुलगी गर्भवती राहिली आहे. या मुलीने अखेर हिम्मत एकवटली आणि पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या