
केंद्र सरकारकडून देशात स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. या निमित्ताने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभाग व 58 महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण शहरात स्वच्छता सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीतून नागरिकांना स्वच्छता संदेश देण्यात आला.
मालवण नगरपरिषद येथून ही रॅली सुरू झाली. रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, 58 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार दिलीप कुमार, प्रा.डॉ.आर.एन. काटकर, प्रा.बी. एच. चौगुले, लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, रणरागिणी ग्रुपच्या डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. मधुरा काटकर, ऍड. सोनल पालव, डॉ. शुभांगी जोशी यांसह एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी नितीन तायशेटे, प्राचार्य डॉ. मंडले, डॉ. शुभांगी जोशी यांनी उपस्थित एनसीसी विद्यार्थ्यांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. यावेळी उत्कृष्ट एनसीसी कडेट्सना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.






























































