वीज खांब डोक्यावर पडून कामगाराचा मृत्यू

229

कुंभारमाठ येथे वीज खांब उभा करत असताना अचानक दोरी तुटून खांब डोक्यावर पडल्याने देवकरण वासुदेव शहारे या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली आहे.

कुंभारमाठ येथील रोहित्राकडे जाणाऱ्या वीजवाहिनीचा खांब उभारण्यासाठी सकाळी कुडाळ येथून महावितरणच्या ठेकेदाराची सहा-सात कामगार आले होते. दुपारी खांब उभे करण्याचे काम करत होते. यात अचानक खांबांला बांधलेली दोरी तुटल्याने खांब खाली उभ्या असलेल्या देवकरण शहारे या कामगाराच्या डोक्यावर कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या अन्य साथीदारांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक भारत फारणे यांनी ग्रामीण रुग्णालयात जात घटनेची माहिती घेतली. घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारीही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या