मालवणात मुसळधार पाऊस, मसुरकर बेटावर पाणी घुसले

417

मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याला दमदार पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या मुसळधार पावसाचा फटका कालावल खाडी पात्रातील मसुरकर जुवा बेटाला बसला आहे. बेटावर नव्याने बांधलेला बंधाराही पाण्याखाली गेला आहे. पाण्याची पातळी वाढल्यास पाणी लोकवस्तीत घुसण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तर बंधाऱ्याच्या कामाबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

गेले दोन दिवस मुसळधार पावसाने मालवणला झोडपून काढले आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यातच हवामान विभागाने अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, समुद्र खवळला आहे. जोरदार लाटा उसळत आहे. दुसरीकडे दमदार पावसामुळे शेतीच्या कामांना जोर आला आहे.

मालवण तालुक्यातील कृषी व धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या घुमडे गावातील वहाळात मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. येथील घुमडाई मंदिरालाही पाण्याने वेढा दिला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

आपली प्रतिक्रिया द्या