
सामना ऑनलाईन । कोलकाता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भारतीय जनता पार्टी यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात आहे. बुधवारी ईदच्या निमित्ताने कोलकात्यातील एका सभेत ममता यांनी भाजपला पुन्हा एकदा आव्हान दिले. मुस्लिम बांधवांनी घाबरण्याची गरज नाही. ‘जो हमसे टकराएगा, चूर चूर हो जाएगा’ यह हमारी घोषणा है, असे म्हणत त्यांनी भाजप नेत्यांना चुचकारले. भाजपने ईव्हीएम घोटाळा करून लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले, पण, तितक्याच वेगाने ते सत्तेवरून पायउतार होतील असेही त्या म्हणाल्या.
‘त्याग का नाम है हिंदू, इमान का नाम है मुसलमान, प्यार का नाम है इसाई, सिखों का नाम है बलिदान, यह हमारा प्यारा हिंदुस्थान, इसकी रक्षा हमलोग करेंगे, जो हमसे टकराएगा चूर चूर हो जाएगा’ अशा शब्दांत त्यांनी आपला राग व्यक्त केला. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये गेल्या आठवडय़ात भाजपा कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर ममता बॅनर्जी या भयंकर चिडल्या होत्या. अशा प्रकारे घोषणा देणाऱयांविरोधात त्यांनी तेव्हापासून मोहीम उघडली आहे.
वही होता है जो मंजूर ए खुदा होता है
इथे कुणालाही घाबरण्याची गरज नाही. ‘मुद्दई लाख बुरा चाए तो क्या होता है, वही होता है जो मंजुर ए खुदा होता है-सूर्य जेव्हा डोक्यावर येतो तेव्हा त्याची किरणे प्रचंड तीव्र होतात, पण काही काळाने त्यांची तीव्रता कमी होते. त्यामुळे घाबरू नका.’ त्यांनी ईव्हीएम घोटाळा करून प्रचंड यश मिळवले असले तरीही तितक्याच तीव्रतेने खाली कोसळतील असे सांगतानाच मुस्लिमांना पश्चिम बंगालमध्ये पूर्ण सुरक्षा दिली जाईल अशी खात्रीही त्यांनी दिली.





















































