
भाजप हा फेकाड्यांचा पक्ष बनला आहे. त्यांच्या नेत्यांना खोटय़ा बातम्या पसरवून आणि बंदुकीचा धाक दाखवत धर्माच्या नावाखाली देशवासीयांत फूट पाडण्यात मोठा रस आहे, अशा शब्दांत तृणमूल नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. माझा जन्म निर्भय हिंदुस्थानात झालाय.बंदूक आणि गोळय़ांनी नागरिकांवर हल्ले करणाऱया भाजप राजवटीत नाही, असेही त्यांनी सुनावले.


























































